S M L

विधानसभेसाठी राज्यातही 'मोदी' फॉर्म्युला !

Sachin Salve | Updated On: May 14, 2014 07:01 PM IST

विधानसभेसाठी राज्यातही 'मोदी' फॉर्म्युला !

14 मे : लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वच पक्षांना वेध लागले आहे. भाजपने विधानसभेसाठी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तोच फॉर्म्युला राज्यातही वापरणार आहे. महाराष्ट्रात लवकरच ज्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली जाईल त्या नेत्यांचं नाव घोषित करणार असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलंय.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा विधानसभा निवडणुकीत यश मिळालं. लोकसभा निवडणुकीतही आधीच नेता निवडल्यामुळे यश मिळेल. त्यामुळे आता विधानसभेसाठी नेतृत्वाची लवकरच घोषणा केली जाईल असं रूडी यांनी स्पष्ट केलंय.

भाजपच्या राज्यातील नेत्यांची मुंबई बैठक झाली. या बैठकीत विधानसभेला कसं सामोरं जायचं यावर चर्चा झाली. या बैठकीअगोदर नाराजी नाट्य घडलं. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं निमंत्रण पत्रिकेवरच नाव छापलं नसल्यामुळे मुंडे नाराज झाले होते. मुंडे या बैठकीला हजर राहणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र भाजपच्या नेत्यांनी मुंडेंची भेट घेऊन मनधरणी केली त्यानंतर मुंडे या बैठकीला हजर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2014 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close