S M L

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2014 06:16 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव

chavan18 मे :  निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. यावरून आता राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध माणिकराव ठाकरे यांच्यातला वाद उफाळून आला आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे जोरदार लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही काल रात्री अर्धा तास नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावर ते आंदोलनही करणार आहेत. दीपक मानकर हे माणिकरावांचे निकटवर्तीय मानले जातात.

राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पुण्यातले काँग्रेसचे उमे दवार विश्वजीत कदम यांनीही व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी, असं पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनीदेखील म्हटलं आहे. पुण्यात आज पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी विश्वजीत कदम यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

दरम्यान उद्या सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक होत असून त्यात राष्ट्रीय पातळीबरोबरच महाराष्ट्रातल्या पराभवाची कारणमिमांसा केली जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी प्रदेश काँग्रेसनं सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांची मुंबईत चिंतन बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातल्या दारुण पराभवाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काय चर्चा होते आणि कोणते निर्णय होतात त्यावरही प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2014 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close