S M L

माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव -नारायण राणे

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2014 11:03 PM IST

565rane_on_kesarkar_3419 मे :  लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणेंचा पराभव नारायण राणेंच्या खूपच जिव्हारी लागला आहे. दै.प्रहार या वर्तमानपत्रात 'माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव' या लेखातून त्यांनी आपली व्यक्त खंत केली आहे.

निलेश राणेंचा पराभव म्हणजे माझाच पराभव आहे असं मी समजतो. कोकणच्या विकासासाठी गेली 25 वर्षं मी अहोरात्र झटूनही मला अपयश मिळालं. हे अपयश माझ्या जिव्हारी लागलंय, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

कोकणी माणसांकडून 'आपली माणसं' म्हणुन अपेक्षा ठेवण्यात माझी चूक झाली. देशात असलेल्या मोदींच्या लाटेचा प्रभाव कोकणात नसेल असा माझा विश्वास होता. पण या निवडणुकीत विरोधकांसोबतच पत्रकार, मित्रपक्ष, काही आप्त आणि पोलीस अधिकार्‍यांची माझ्या विरोधात आघाडी निर्माण केली. या पराभवानं मी संपेन असं कोणीही समजू नये पुर्वीच्या जिद्दीनं आणि तडफेनं मी पुन्हा उभा राहीन असा आत्मविश्वास मला आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2014 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close