S M L

राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी रद्द

Sachin Salve | Updated On: May 19, 2014 10:39 PM IST

96kisan_kathar4519 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचा धुव्वा उडालाय त्यातच राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांची आमदारकी रद्द करण्यात आलीय.

2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मालमत्तेचं खोटं प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर आमदारकी गमावण्याची वेळ आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सावंत यांनी यासंबंधी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यात हा सर्व प्रकार उघड झाला.

याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने कथोरेंना 6 वर्षं निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात कथोरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथं त्यांचं अपील फेटाळण्यात आलं. अरूण सावंत यांनी खटला मागे घ्यावा यासाठी कथोरेंनी अनेक प्रयत्न केले.

सावंतांच्या वकिलांवर दबाव टाकला सावंत यांनी खटला मागे घ्यावा याकरता त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. पण अरूण सावंत गेली 10 वर्ष हा लढा देत आहेत. दरम्यान या प्रकरणी आमदार किसन कथोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2014 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close