S M L

...तर आघाडीचा उपयोग काय ? काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल

Sachin Salve | Updated On: May 22, 2014 06:35 PM IST

Image img_219692_congressncp4_240x180.jpg22 मे : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचं खापर कुणावर फोडावं यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आलीय. राष्ट्रवादीबाबत कठोर भूमिका घेण्याची हीच योग्य वेळ अशी भूमिका काँग्रेस नेते आणि पधाधिकार्‍यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची चिंतन बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीविरोधात नाराजीचा सूर उमटला. उघड विरोध होत असेल तर आघाडीचा उपयोग काय असा सवालच काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

पक्षासमोर भरपूर आव्हानं आहेत पराभवाची कारणं शोधण्यासाठी मुळापर्यंत जावं लागेल आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं सर्वात मोठं आव्हान पक्षासमोर आहे असं मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचीही बैठक पार पडली. त्यात विधानसभा निवडणुका काँग्रेससोबतच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेचे निकाल हे लोकसभेच्या निकालांपेक्षा वेगळे असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. यूपीए 2 मध्ये यूपीए 1 पेक्षा समन्वय कमी होता हे प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य त्यांच्या वैयक्ति अनुभवावर आधारित आहे अशी सारवासारवही त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत आघाडीला जेमतेम सहाच जागा मिळाल्यात. आघाडीला हिंगोली आणि नांदेडमध्ये दोनच जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला सहाच जागांवर समाधान मानावे लागले. पराभवावर चिंतन करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका सुरू आहे. मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठकही पार पडली. या बैठकीत झालं गेलं विसरा आणि विधानसभेला एकत्र सामोरं जावू असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विधानसभेसाठी काय रणनीती आखायची यासाठी दोन्हीकडून चर्चा आता सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2014 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close