S M L

आघाडीचं सूडबुद्धी राजकारण; गावांचं पाणी केलं बंद -भांडारी

Sachin Salve | Updated On: May 24, 2014 10:23 PM IST

आघाडीचं सूडबुद्धी राजकारण; गावांचं पाणी केलं बंद -भांडारी

24 मे : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जिथं आघाडीला मतदान कमी झालं, तिथे पाणी आणि वीज बंद केली गेल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेत.

सातार्‍यात शहापुरी भागामध्ये 3 दिवस पाणीपुरवठा बंद आहे. तासगांव मतदार संघात 52 गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तर कवठे-महांकाळच्या 20 गावात वीज नसल्याने पाणी योजना बंद असल्याचा आरोप माधव भांडारी यांनी केला आहे. हे सुडाचं राजकारण बंद करा असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ लिक झाला होता. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाहीतर गावचं पाणी बंद करू अशी धमकी दिली होती. याची आठवणही भांडारी यांनी करुन दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2014 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close