S M L

काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी एक व्हावं - दिग्विजय सिंग

Samruddha Bhambure | Updated On: Aug 21, 2014 05:34 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी एक व्हावं - दिग्विजय सिंग

21 ऑगस्ट: जागा वाटपावरून वाद घालत बसण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन मजबूत आघाडी बनवावी असं मत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी काल कोल्हापूरमध्ये झालेल्या राजीव गांधी सदभावना दौडच्या कार्यक्रमात व्यक्त केलं.

यावेळेस त्यांनी मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातल्या समस्या सुटल्या नाहीत तर त्या कायम आहेत, असं सांगत धर्माच्या नावावर देशात जातीय दंगली करून राज्य निर्माण करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही सिंह यांनी केला आहे. धर्मा-धर्मांमध्ये भांडणे लावून राजकारण करण्याचा धंदा भाजपने सत्तेवर आल्यानंतरही सुरू ठेवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या भावना भडकावण्याचा उद्योग अजूनही सुरू आहे.

नियोजन आयोगाने गेल्या 60 वर्षामध्ये या देशाला एक मजबूत आर्थिक आधार दिला आहे त्याच्यामुळे देश आज जगातील तिसर्‍या शक्तीत गणला जातो त्या महत्वपूर्ण संस्थेला बंद करण्यापूर्वी तुमच्याकडे काहीही सक्षम पर्याय नाही लोकांकडून सूचना मागवल्या जात आहेत पर्याय नसताना आयोग का बंद करताय असा रोखठोक सवाल दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारला केला आहे.

दरम्यान,लोकसभेतल्या पराभवानंतर अँटोनी समितीचा जो अहवाल आलाय त्याबाबत मला काहीच माहिती नाही पण या पराभवाला कोणी एक व्यक्ती जबाबदार नसून ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे असं मत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त करत मोदी म्हणतात की काँग्रेस सरकारनं 60 वर्षांमध्ये काहीच केलं नाही. पण मग पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी सात प्रकल्पांचं उद्घाटन केलं. मग ही कामं कोणी केली?, असा सवालही सिंह यांनी विचारला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2014 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close