S M L

शिवसेनेचे घूमजाव 'गीते', मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही !

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2014 04:28 PM IST

शिवसेनेचे घूमजाव 'गीते', मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही !

01 ऑक्टोबर : केंद्रातून बाहेर पडणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि लगेच दुसर्‍या दिवशी त्यांनी घूमजावही केलं. आता त्यांच्याच सूर 'गीते' यांनीही आरवला. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं केंद्रीय अवजड उद्योग

मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी स्पष्ट करून टाकलंय. उद्याच सांगता येत नाही पण राजकारणात काहीही शक्य आहे असं सुचक वक्तव्यही गीतेंनी केलं.

गेल्या 25 वर्षांची युती जागावाटपाच्या तिढ्यावरून तुटली. युती तुटल्यानंतर सेनेचा स्वाभिमान जागा झाला आणि शिवसेना आता केंद्रातून बाहेर पडणार असा निर्णय उद्धव यांनी जाहीर केला. याला निमित्त लाभले ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज यांनी आपल्यासभेत

जर राज्यात युती तुटली तर केंद्रात पाठिंबा कसा देतात ? अनंत गीते राजीनामा का देत नाही ? असा सवाल सेनेला विचारला होता. त्यानंतर

शिवसेनेनं मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढंच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील असंही उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केलं होतं.पण त्यानंतर दुसर्‍या दिवशी उद्धव यांनी घूमजाव केलं. एनडीए सरकारमधून बाहेर पडणं सोप नाही. एनडीएच्या आधारावर सर्वांना मतं मिळाली आहेत. पाठिंबा काढला तर पुन्हा निवडणुका घ्यावा लागतील आणि त्यावेळी जनतेचा काय कौल होता आणि आता काय मिळेल याबद्दल साशकंता आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव यांनी घूमजाव केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते अनंत गीते यांनीही त्यांच्याच सुरात सुरू आरवलाय. एनडीएमुळे अनेक सदस्य निवडून आलेत त्यात शिवसेनेचेही सदस्य आहेत. आम्हीही एनडीएचे एक घटक आहोत त्यामुळे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार हा प्रश्नच नाही असं गीतेंनी स्पष्ट केलं. तसंच आम्ही एनडीएसोबत आहोत आणि उद्याबद्दल काही सांगता येत नाही पण राजकारणात काहीही होऊ शकतं असे संकेतही गीते यांनी दिले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close