S M L

खामगावमध्ये 5 दिवसाच्या बाळाची चोरी

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही महिला एका व्यक्तीसोबत एका 5 वर्षाच्या मुलीसोबत आली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 12:36 PM IST

खामगावमध्ये 5 दिवसाच्या बाळाची चोरी

खामगाव, 27 सप्टेंबर: बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव सामान्य रुग्णालयातून एका 5 दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन चांगलंच हादरलं आहे.

खामगाव येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी जिल्हाभरातील रुग्णांची मोठी गर्दी असते. ज्या महिलेचं बाळ चोरीला गेलेलं आहे ती महिला नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावावरून डिलिव्हरीसाठी येथे आली होती. 5 दिवसांपूर्वी या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. पण तिच्या बाळाची चोरी झाल्याने तिचे दुःख अनावर होते आहे.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही महिला एका व्यक्तीसोबत एका 5 वर्षाच्या मुलीसोबत आली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अगोदर या महिलेने 3 ते 4 तास सर्व प्रसूती झालेल्या महिलांची रेकी केली व कोणाला मुलगा झाला कोणाला मुलगी झाली याची विचारणा सुद्धा अनेक महिलांना केली असल्याचं रुग्णालयातील महिला सांगत आहे. रात्री 3.45 वाजता या महिलेने या बाळाला एका पिशवीत टाकून पळ काढल्याचे समोर आले आहे. हे सर्व होत असताना रुग्णालयातील नर्सेस मात्र गाढ झोपेत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ संबंधितांना मेमो बजावले असून पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close