S M L

'शिवसेनेला गांडूळ म्हटलं तर काय चुकलं',अजित पवारांचं सेनेवर टीकास्त्र

" उद्धव ठाकरेंनी एकीकडे समृद्धी हायवेला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी हायवेच्या जमीन भूसंपादनासाठीचे चेक वाटप सुरू करायचं"

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2017 05:25 PM IST

'शिवसेनेला गांडूळ म्हटलं तर काय चुकलं',अजित पवारांचं सेनेवर टीकास्त्र

नंदूरबार, 14 जुलै: समृद्धी हायवेबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादीचे नेचे अजित पवारांनी पुन्हा टार्गेट केलंय. उद्धव ठाकरेंनी एकीकडे समृद्धी हायवेला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी हायवेच्या जमीन भूसंपादनासाठीचे चेक वाटप सुरू करायचं, शिवसेनेचं हे कृत्य म्हणजे निव्वळ दुतोंडीपणा असल्याची टीका अजित पवारांनी केलीय. ते नंदूरबारमध्ये बोलत होते.

अजित पवारांनी मध्यंतरी शिवसेनेला गांडूळ म्हटल्यानंतर सेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांना भ्रष्टाचारी अजगराची उपमा दिली होती. त्यावर अजित पवारांनी सेनेच्या समृद्धी हायवेसंबंधीच्या दुटप्पी भूमिकेकडे अंगुलीनिर्देश करत, मी शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हटलं तर चुकलं कुठं असा सवाल उपस्थित केलाय.

मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी हायवेला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची बाजू घेत समृद्धी हायवेला जाहीर विरोध केला होता. पण त्याच शिवसेनेचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कालच हायवेसाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केलीय. हायवेसाठी जमीन दिलेल्या पहिल्या शेतकऱ्याला एकनाथ शिंदेंनी कालच जमीन खरेदीच्या धनादेशाचं वाटप केलं. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर विरोधकांकडून जोरदार टीका होतेय. अजित पवारांनीही तोच धागा पकडत शिवसेनेला पुन्हा टार्गेट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close