S M L

मुलाच्या वाढदिवशीच शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवशीच वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागल्यामुळे गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होतेय.

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2017 01:58 PM IST

मुलाच्या वाढदिवशीच शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

24 जून : जम्मूमध्ये पूँछ सेक्टरमध्ये पाक सैनिकांच्या गोळीबार औरंगाबादचे संदीप जाधव यांना वीरमरण आलं.  शहीद संदीप जाधव यांच्यावर सिल्लोड तालुक्यातल्या केळगावमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद संदीप जाधव यांच्या मुलाचा तर नेमका आजच पहिला वाढदिवस आहे. चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवशीच वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागल्यामुळे गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होतेय.

आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो संख्येने गावकरी आले होते. अतिशय शोकाकूळ वातावरणात शहीद संदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी इतमामात शहीद संदीप जाधव यांना अखरेचा निरोप देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close