S M L

उद्या ऊस दर आंदोलनाचा निर्णायक लढा ?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 24, 2013 03:12 PM IST

Image img_177512_rajusheti_240x180.jpg24 नोव्हेंबर :पश्चिम महाराष्ट्रात आज ऊस दराच्या आंदोलनाबाबत निर्णायक लढा पुकारण्यात आला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज कराडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जमले आहेत.

 

उद्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यातिथी आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर दिग्गज मंत्री कराडमध्ये येणार आहेत.

मात्र मंत्र्यांना या कार्यक्रमाला येऊ न देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. काल मुंबईतली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातले स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले असून ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात येतेय.

रात्री 12 वाजता वारणा साखर कारखान्याचे शेरी पार्कमधले शेती कार्यालय पेटवण्यात आले असून सांगली जिल्ह्यातही अनेक एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय. तर पंढरपूर तालुक्यात ऊस वाहून नेणारा एक ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी पेटवून दिला.

 

दरम्यान आज कराडमध्ये राज्यातल्या अनेक भागांमधून कार्यकर्ते येणार असून त्यापार्श्वभूमीवर कराडशहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच उद्या 'कराड बंद'चा आवाहन करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2013 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close