S M L

ऊस आंदोलन पेटले, सांगली- कराडमध्ये रास्ता रोको

Samruddha Bhambure | Updated On: Nov 27, 2013 03:10 PM IST

ऊस आंदोलन पेटले, सांगली- कराडमध्ये रास्ता रोको

oos jalpol27 नोव्हेंबर :  ऊस दराबाबत अजून ठोस निर्णय झाला नसल्याने सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र झाले आहे. सांगली आणि कराडमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. सांगलीतल्या नांद्रे गावात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली असून नंतर या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

सांगलीतल्या नांद्रे,वसगडे,ब्राम्हणाळ,ताकारी आणि तुपारी या गावात कडकडीत बंद पाळण्यात आली आहे. तर कराडमधल्या तासगाव-कराड मार्गावर तुपारी फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मांजर्डे,वायफळे,बोरगाव,येळावी आणि कवठेएकंद या सारख्या अनेक गावातही रास्तारोको करुन वाहतूक ठप्प करण्यात येत आहे.

 

कराडमध्ये गेल्या पाच दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून शेकडो शेतकरी कराडमध्ये दाखल झाले आहेत. या सर्व शेतकर्‍यांच्या जेवनाची व्यवस्था कराडच्या आसासच्या गावांनी केली असून या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. कराडमध्ये सध्या उस दराबाबत शेतकर्‍यांचं आंदोलन सुरू आहे, एका शेतकर्‍याने चक्क नदीच्या पात्रातच ठाण मांडून सरकारच्या भूमिकाचा निषेध केला आहे. तर सरकार शेतकर्‍यांची पिळवणूक करत असून सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहु नये असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close