S M L

...तर राज्याचं नेतृत्त्व करेन -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2014 04:38 PM IST

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray530 सप्टेंबर : उद्या जनतेनं आपला कौल जर मनसेला दिला तर राज ठाकरे या राज्याचं नेतृत्व करेन अशी इच्छा पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावून दाखवली. तसंच निवडणुकांसाठी जिकडे तिकडे केवळ फड लागलाय, तमाशा करून ठेवलाय. लोकं येणार भाषणं करणार, मज्जा करणार पण मी त्यातला नाही, मला त्याची गरज नाही. माझ्या हातून जर राज्याचं भलं होणार नसले तर पक्ष बंद करून टाकेन असंही राज ठाकरे जाहीर करून टाकलंय. राज यांची अमरावतीत सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत सपाटून पराभवाचा धक्का पचावल्यानंतर विधानसभेसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपलं 'इंजिन' रुळावर आणण्यासाठी मैदानात उतरले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत कांदिवली इतं प्रचाराचा नारळ फोडला आणि आता थेट अमरावती गाठली. अमरावतीमध्ये दर्यापूर इथं राज ठाकरेंची भव्य सभा पार पडली. यावेळी राज यांनी या सभेत आपली मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा बोलून दाखवली. सगळ्या योजना माझ्या तयार आहे. फक्त थांबलो आहेत 15 तारखेसाठी. तुम्ही माझ्या शिलेदारांच्या पाठीशी उभे राहा, उद्या जनतेनं आपला कौल जर मनसेला दिला तर राज ठाकरे या राज्याचं नेतृत्व करेन अशी इच्छा राज ठाकरे यांनी बोलावून दाखवली. त्यानंतर राज यांनी आपला मोर्चा अजित पवार यांच्याकडे वळवला. अजित पवार आपला तोल सोडून कालव्यात लघुशंका करू असं म्हणता, राज यांनी असं म्हणताच सभेत एकच टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्या पडल्यात. यावर राज यांनी संतापून तुम्हा लोकांना अशी मज्जा येते म्हणूनच ही लोकं तुमच्यावर 60 वर्ष राज्य करू शकली. आमची मनं मेली आम्हाला काही वाटतं नाही असं तुम्ही सगळ्यांनी करून ठेवलं आहे असा शब्दात राज यांनी सभेत हजर असलेल्या अमरावतीकरांना डोस पाजला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून तिकिटासाठी 2 कोटी रुपये मागितले जात आहे असा आरोपही राज यांनी केला. राजकारण आणि निवडणुकांसाठी केवळ फड लावलाय, तमाशा करून ठेवलाय. लोकं येणार भाषणं करणार, मज्जा करणार पण मी त्यातला नाही, मला त्याची गरज नाही. माझ्या हातून जर राज्याचं भलं होणार नसले तर पक्ष बंद करून टाकेन. मला नुसतं तुमच्या समोर येऊन असली भाषणं करणं आणि नुसरा विरंगुळा म्हणून तुमच्या समोर येणं हे मला आवडणार नाही आणि मला हे परवडणार ही नाही, मला त्याची गरजपण नाही या राजकारणावर माझं घर चालत नाही असा घणाघात त्यांनी केला. तसंच मनसे सत्तेत आल्यावर मराठी तरूणांना नोकर्‍यांमध्ये प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close