S M L

नरेंद्र मोदींनी भाजपला हायजॅक केलं -अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 13, 2014 04:20 PM IST

नरेंद्र मोदींनी भाजपला हायजॅक केलं -अजित पवार

13 ऑक्टोबर :  नरेंद्र मोदींनी भाजपला हायजॅक केलं आहे. वाजपेयी, अडवाणी, मुरलीमनोहर जोशींना मोदींनी अडगळीत टाकलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. तसंच स्वातंत्र झाल्यासारखं वाटतंय. मग चार वर्षांनंतर आता जाग आली का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससोबतचं मोदींनाही लक्ष केलं आहे.

...मग काँग्रेसला चार वर्षांनी जाग आली का?

राष्ट्रवादीबरोबर आघाडी तुटली हे बरंच झालं, आघाडी तुटल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतंय अशी घणाघाती टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी काल सांगलीत केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने आधी राष्ट्रवादीसोबत सत्ता उपभोगून घेतली आणि आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतायेत, स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. मग चार वर्षांनंतर आता जाग आली का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर त्यांनी मोदींकडे मोर्चा वळवला. पंतप्रधान आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ राज्यात घालवत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एवढा वेळ घालवण्याची गरज नव्हती. मोदींनी महाराष्ट्रात इतका प्रचार केला की बोलून- बोलून त्यांचा घसा बसला असं म्हणत, मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी चीन आणि पाकिस्तानवर कारवाई करणार असं म्हणायचे पण प्रत्यक्षात पाकिस्तानकडून गोळीबार चालू असताना मोदी काहीच करत नाही, त्याऐवजी मोदी प्रचारात वेळ घालवत आहे, असंही अजित पवार म्हटले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close