S M L

युती तुटायला एकनाथ खडसेच कारणीभूत -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2014 09:08 PM IST

युती तुटायला एकनाथ खडसेच कारणीभूत -उद्धव ठाकरे

13 ऑक्टोबर : मला आतल्या गोटातून जे कळलं युती तुटण्यासाठी एकनाथ खडसे कारणीभूत आहे. कारण कुणीही बोलायला तयार नव्हतं त्यांनीच संध्याकाळी मला फोन केला होता. मला फार दु:ख असं सांगून युती तोडण्याचा निरोप कळवला होता असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना जळगावात एकनाथ खडसे यांच्या बाल्लेकिल्यात मुक्ताईनगर इथं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. गेल्या 25 वर्षांची युती तोडून भाजपने जनतेचा विश्वासघात केलाय. युती तुटली याचं दु:ख आहे पण युती तोडण्यासाठी भाजपच जबाबदार आहे. आज म्हणता आम्ही खंजीर खुपसला तेव्हा अंजीर खात होता तेव्हा शिवसेना पाहिजे होती आणि काम झाल्यावर शिवसेना नकोशी झाली. एकनाथ खडसे युती तुटल्याच्या आदल्यादिवशी दिवसभर भाजपच्या कार्यालयात बसून होते. युती तोडण्याबद्दल कुणीही बोलण्यासाठी तयार नव्हतं पण खडसेंनीच पुढाकार घेतल आणि फोन करून मला सांगितलं असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला. सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेना 50 योजना राबवणार आहे त्यामुळे शिवसेनेचे हात बळकट करा असं आवाहनही उद्धव यांनी केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close