S M L

अफवांवर विश्वास ठेवू नका,परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

11 ऑगस्टसीएसटीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे पण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, एसएमएस, सोशल माध्यम फेसबुक, ट्विटरच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. तसेच रमजान ईद जवळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका झालेली घटनाही निषेधार्थ आहे त्याची कसून चौकशी केली जाईल असंही आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं. आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि जमावाने वाहनांची तोडफोड करत पेटवून दिले. आबांनी आपला सांगलीचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. घटनास्थळी अरूप पटनाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली आहे. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी मंत्री, आमदार, नगरसेवकांनी धाव घेऊन लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलंय. एस.एम.एस आणि फेसबुकवरून खोटी माहिती पसरवली जातेय. अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार नवाब मलिक त्यांनी केली आहे. संबंधित बातम्यासीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 11:21 AM IST

अफवांवर विश्वास ठेवू नका,परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

11 ऑगस्ट

सीएसटीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे पण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, एसएमएस, सोशल माध्यम फेसबुक, ट्विटरच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. तसेच रमजान ईद जवळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका झालेली घटनाही निषेधार्थ आहे त्याची कसून चौकशी केली जाईल असंही आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं.

आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि जमावाने वाहनांची तोडफोड करत पेटवून दिले. आबांनी आपला सांगलीचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. घटनास्थळी अरूप पटनाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली आहे. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी मंत्री, आमदार, नगरसेवकांनी धाव घेऊन लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलंय. एस.एम.एस आणि फेसबुकवरून खोटी माहिती पसरवली जातेय. अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार नवाब मलिक त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

सीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close