S M L

नागपूरमध्ये प्राध्यापकाची गोळ्या झाडून हत्या

03 एप्रिलनागपूर : इथं मानेवाडा परिसरात पहाटे घरात घूसून प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घडना घडली आहे. या घटनेत प्राध्यापक योगेश डाखोळे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले. याप्रकरणी गुंड अन्वर खान ला अटक करण्यात आली आहे. अन्वर खान हा डाखोळे यांच्या मुलीला गेल्या 15 दिवसांपासून त्रास देत होता. 19 तारखेला यासंदर्भात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या मुलाच्या विरोधात तक्रारही करण्यात होती. पोलिसांनी अन्वरला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला समज दिली. या गोष्टीचा राग मानून अन्वरने नागपूरच्या आसपास कुठूनतरी देशी कट्टा विकत घेतला आणि संपुर्ण परिवाराचा खून करण्याचा प्लॅन आखला. आज पहाटे या तरुणाने दुसर्‍या बिल्डिगवरुन जावून प्राध्यापक डाखोळेंच्या घरी प्रवेश केला. गोळीबारात डाखोळे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:04 PM IST

नागपूरमध्ये प्राध्यापकाची गोळ्या झाडून हत्या

03 एप्रिल

नागपूर : इथं मानेवाडा परिसरात पहाटे घरात घूसून प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घडना घडली आहे. या घटनेत प्राध्यापक योगेश डाखोळे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले. याप्रकरणी गुंड अन्वर खान ला अटक करण्यात आली आहे. अन्वर खान हा डाखोळे यांच्या मुलीला गेल्या 15 दिवसांपासून त्रास देत होता. 19 तारखेला यासंदर्भात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या मुलाच्या विरोधात तक्रारही करण्यात होती. पोलिसांनी अन्वरला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला समज दिली. या गोष्टीचा राग मानून अन्वरने नागपूरच्या आसपास कुठूनतरी देशी कट्टा विकत घेतला आणि संपुर्ण परिवाराचा खून करण्याचा प्लॅन आखला. आज पहाटे या तरुणाने दुसर्‍या बिल्डिगवरुन जावून प्राध्यापक डाखोळेंच्या घरी प्रवेश केला. गोळीबारात डाखोळे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close