S M L

लक्ष्मण माने फरार

03 एप्रिलसातारा : 'उपरा'कार, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप करुन दहा दिवस आज पूर्ण होत आहेत. पण, लक्ष्मण माने अजूनही पोलिसांना शरण आलेले नाहीत. त्यांचा अंतरीम जामीन सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळलाय. त्यानंतरही लक्ष्मण माने पोलिसांसमोर शरण न आल्यानं या प्रकरणाभोवतीचा संशय वाढत चाललाय. आज सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सातार्‍यामध्ये याप्रकरणातल्या तक्रारदार महिलांची भेट घेतली. 'तक्रारदार महिलांचे आरोप गंभीर आहेत, तक्रारदार महिलांच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा भयानक आहेत. माने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी झाली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया विद्या बाळ यांनी दिली. त्यानंतर त्यांनी, भटक्या विमुक्त समाजातल्या मुलांसाठीच्या शारदाबाई पवार या संस्थेच्या आश्रमशाळेलाही भेट दिली. लक्ष्मण माने यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माने यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घ्यायला टाळाटाळ केली. लक्ष्मण माने यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा अटकपूर्व अंतरीम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला. पण, अंतरीम जामिनाचा मुख्य अर्ज कोर्टापुढे सहा एप्रिलला सुनावणीसाठी येणार आहे. त्या सुनावणीमध्ये सरकारी वकील आपली बाजू मांडतील. त्यानंतर जामिनाचा काय निर्णय होतोय, याची आम्ही वाट बघणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, 2003 ते 2010 या 7 वर्षात वेळोवेळी बलात्कार केल्याची या महिलांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतलीये. आणि लक्ष्मण माने यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेत. नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार झाल्याचं या महिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लक्ष्मण माने यांना आवाहन केलंय. या प्रकरणातलं सत्य बाहेर येण्यासाठी माने यांनी पोलिसांना दिव्यातून जावं लागेल, हे टाळता येणार नाही असं बाबा आढाव म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:02 PM IST

लक्ष्मण माने फरार

03 एप्रिल

सातारा : 'उपरा'कार, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप करुन दहा दिवस आज पूर्ण होत आहेत. पण, लक्ष्मण माने अजूनही पोलिसांना शरण आलेले नाहीत. त्यांचा अंतरीम जामीन सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळलाय. त्यानंतरही लक्ष्मण माने पोलिसांसमोर शरण न आल्यानं या प्रकरणाभोवतीचा संशय वाढत चाललाय.

आज सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सातार्‍यामध्ये याप्रकरणातल्या तक्रारदार महिलांची भेट घेतली. 'तक्रारदार महिलांचे आरोप गंभीर आहेत, तक्रारदार महिलांच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा भयानक आहेत. माने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी झाली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया विद्या बाळ यांनी दिली. त्यानंतर त्यांनी, भटक्या विमुक्त समाजातल्या मुलांसाठीच्या शारदाबाई पवार या संस्थेच्या आश्रमशाळेलाही भेट दिली. लक्ष्मण माने यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माने यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घ्यायला टाळाटाळ केली.

लक्ष्मण माने यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा अटकपूर्व अंतरीम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला. पण, अंतरीम जामिनाचा मुख्य अर्ज कोर्टापुढे सहा एप्रिलला सुनावणीसाठी येणार आहे. त्या सुनावणीमध्ये सरकारी वकील आपली बाजू मांडतील. त्यानंतर जामिनाचा काय निर्णय होतोय, याची आम्ही वाट बघणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, 2003 ते 2010 या 7 वर्षात वेळोवेळी बलात्कार केल्याची या महिलांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतलीये. आणि लक्ष्मण माने यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेत. नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार झाल्याचं या महिलांनी तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लक्ष्मण माने यांना आवाहन केलंय. या प्रकरणातलं सत्य बाहेर येण्यासाठी माने यांनी पोलिसांना दिव्यातून जावं लागेल, हे टाळता येणार नाही असं बाबा आढाव म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close