S M L

'शिर्डी संस्थान 25 कोटी मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करा'

05 एप्रिलमुंबई हायकोर्टाने शिर्डी संस्थानला दुष्काळ निवारणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दुष्काळनिवारणाच्या कामांसाठी शिर्डी संस्थानकडून मदत मागितली होती. पण, हे 25 कोटी जिल्हा प्रशासनाला न देता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. शिर्डी संस्थानच्या कारभारातल्या काही आक्षेपांवर राजेंद्र गोंदकर अणि संदीप कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायलयात ही जनहित याचिका दाखल केली होती. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी शिर्डी संस्थानकडून निधीची मदत मागितली होती. मात्र, हे 25 कोटी रुपये फक्त अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे देण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे देण्यात यावेत असा आदेश कोर्टाने दिला. त्याशिवाय संस्थानने भक्तांना पिण्याचं शुद्ध पाणी, प्रसाद आणि भोजन मोफत द्यावं आणि व्हीआयपी पासेसची मोफत सेवा बंद करावी असेही आदेश देण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:13 PM IST

'शिर्डी संस्थान 25 कोटी मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करा'

05 एप्रिल

मुंबई हायकोर्टाने शिर्डी संस्थानला दुष्काळ निवारणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दुष्काळनिवारणाच्या कामांसाठी शिर्डी संस्थानकडून मदत मागितली होती. पण, हे 25 कोटी जिल्हा प्रशासनाला न देता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. शिर्डी संस्थानच्या कारभारातल्या काही आक्षेपांवर राजेंद्र गोंदकर अणि संदीप कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायलयात ही जनहित याचिका दाखल केली होती. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी शिर्डी संस्थानकडून निधीची मदत मागितली होती. मात्र, हे 25 कोटी रुपये फक्त अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे देण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे देण्यात यावेत असा आदेश कोर्टाने दिला. त्याशिवाय संस्थानने भक्तांना पिण्याचं शुद्ध पाणी, प्रसाद आणि भोजन मोफत द्यावं आणि व्हीआयपी पासेसची मोफत सेवा बंद करावी असेही आदेश देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2013 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close