S M L

अखेर लक्ष्मण माने पोलिसांना शरण

08 एप्रिललैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी फरार असलेले 'उपरा'कार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. आज दुपारी लक्ष्मण मानेंनी सातारा पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माने यांनी पोलिसांना शरण यावे असं आवाहन केल्यानंतर अखेर 13 दिवसानंतर माने यांनी शरणागती पत्कारली.उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप आहे. माने यांनी नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आमिष दाखवून 2003 ते 2010 या 7 वर्षात वेळोवेळी बलात्कार केल्याची पीडित महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार लक्ष्मण माने यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर लक्ष्मण माने फरार झाले होते. या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता पण सातारा जिल्हा न्यायालयाने अंतरीम जामीन फेटाळला. या घटनेला 13 दिवस उलटले असताना लक्ष्मण माने यांच्याविरोधात आणखी एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. ही महिलादेखील याच संस्थेत काम करत होती. 1999 ते 2001 या काळात आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार तिनं केली आहे. लक्ष्मण माने यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे साहित्य,सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होता. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष्मण माने यांनी फरार न राहता समोर येऊन प्रकरणाला सामोरं जावं असं आवाहन केलं होते.सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सातार्‍यामध्ये याप्रकरणातल्या तक्रारदार महिलांची भेट घेतली. 'तक्रारदार महिलांचे आरोप गंभीर आहेत, तक्रारदार महिलांच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा भयानक आहेत. माने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी झाली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया विद्या बाळ यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लक्ष्मण माने यांना आवाहन केलंय. या प्रकरणातलं सत्य बाहेर येण्यासाठी माने यांनी पोलिसांना दिव्यातून जावं लागेल, हे टाळता येणार नाही असं मतही बाबा आढाव यांनी व्यक्त केलं होतं. अखेरीस ज्यांच्या कृपेमुळे लक्ष्मण माने मोठे झाले. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहन वजा आदेशामुळे माने यांना शरणागती पत्कारावी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:52 PM IST

अखेर लक्ष्मण माने पोलिसांना शरण

08 एप्रिल

लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी फरार असलेले 'उपरा'कार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. आज दुपारी लक्ष्मण मानेंनी सातारा पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माने यांनी पोलिसांना शरण यावे असं आवाहन केल्यानंतर अखेर 13 दिवसानंतर माने यांनी शरणागती पत्कारली.

उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप आहे. माने यांनी नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आमिष दाखवून 2003 ते 2010 या 7 वर्षात वेळोवेळी बलात्कार केल्याची पीडित महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार लक्ष्मण माने यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर लक्ष्मण माने फरार झाले होते. या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता पण सातारा जिल्हा न्यायालयाने अंतरीम जामीन फेटाळला.

या घटनेला 13 दिवस उलटले असताना लक्ष्मण माने यांच्याविरोधात आणखी एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. ही महिलादेखील याच संस्थेत काम करत होती. 1999 ते 2001 या काळात आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार तिनं केली आहे. लक्ष्मण माने यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे साहित्य,सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होता. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष्मण माने यांनी फरार न राहता समोर येऊन प्रकरणाला सामोरं जावं असं आवाहन केलं होते.

सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सातार्‍यामध्ये याप्रकरणातल्या तक्रारदार महिलांची भेट घेतली. 'तक्रारदार महिलांचे आरोप गंभीर आहेत, तक्रारदार महिलांच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा भयानक आहेत. माने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी झाली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया विद्या बाळ यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लक्ष्मण माने यांना आवाहन केलंय. या प्रकरणातलं सत्य बाहेर येण्यासाठी माने यांनी पोलिसांना दिव्यातून जावं लागेल, हे टाळता येणार नाही असं मतही बाबा आढाव यांनी व्यक्त केलं होतं. अखेरीस ज्यांच्या कृपेमुळे लक्ष्मण माने मोठे झाले. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहन वजा आदेशामुळे माने यांना शरणागती पत्कारावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2013 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close