S M L

राज ठाकरेंना जळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

08 एप्रिलजळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव कोर्टाने जामीन मंजूर केलाय. सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी राज ठाकरे आज कोर्टात हजर झाले. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांचे पडसाद राज्यभर उमटले होते. जळगावामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अटकेचा निषेध करत वाहनांची नासधूस केली होती. याबाबत राज यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्या प्रकरणी राज यांना या अगोदर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र व्यक्तिगत कामामुळे ठाकरे हजर राहु शकले नाही. अखेरीस आज 8 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीसाठी राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते. त्यांना आज 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.तसंच यापुढे सुनावणीसाठी हजर न राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:52 PM IST

राज ठाकरेंना जळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

08 एप्रिल

जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव कोर्टाने जामीन मंजूर केलाय. सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी राज ठाकरे आज कोर्टात हजर झाले. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांचे पडसाद राज्यभर उमटले होते. जळगावामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अटकेचा निषेध करत वाहनांची नासधूस केली होती. याबाबत राज यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्या प्रकरणी राज यांना या अगोदर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र व्यक्तिगत कामामुळे ठाकरे हजर राहु शकले नाही. अखेरीस आज 8 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीसाठी राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते. त्यांना आज 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.तसंच यापुढे सुनावणीसाठी हजर न राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2013 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close