S M L

छातीत दुखू लागल्यामुळे लक्ष्मण माने रूग्णालयात दाखल

09 एप्रिललैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले उपराकार लक्ष्मण माने यांना सातार्‍याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माने हे काल पंधरा दिवसांनी सातारा पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. आज मानेंना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार होतं. पण आज सकाळी छातीत दुखायला लागल्यानं लक्ष्मण माने यांना जिल्हा रुग्णालयात आयसीयु विभागात दाखल करण्यात आलं आहे. आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग लक्ष्मण माने यांना कोर्टात हजर करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याच संस्थेतल्या तीन महिलांनी त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. हे सगळं आपल्याविरुद्धचं षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी या मुलाखतीत केलाय. शिवाय हरी नरके, बाळकृष्ण रेणके आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मानेंच्या संस्थेतून निलंबित करण्यात आलेले काही शिक्षक या षड्‌यंत्रात सहभागी आहेत, असाही आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:47 PM IST

छातीत दुखू लागल्यामुळे लक्ष्मण माने रूग्णालयात दाखल

09 एप्रिल

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले उपराकार लक्ष्मण माने यांना सातार्‍याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माने हे काल पंधरा दिवसांनी सातारा पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. आज मानेंना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार होतं. पण आज सकाळी छातीत दुखायला लागल्यानं लक्ष्मण माने यांना जिल्हा रुग्णालयात आयसीयु विभागात दाखल करण्यात आलं आहे. आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग लक्ष्मण माने यांना कोर्टात हजर करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याच संस्थेतल्या तीन महिलांनी त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. हे सगळं आपल्याविरुद्धचं षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी या मुलाखतीत केलाय. शिवाय हरी नरके, बाळकृष्ण रेणके आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मानेंच्या संस्थेतून निलंबित करण्यात आलेले काही शिक्षक या षड्‌यंत्रात सहभागी आहेत, असाही आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2013 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close