S M L

गोपीनाथ मुंडेंनी सोडलं उपोषण

09 एप्रिलभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद इथं सोमवारपासून दुष्काळाच्या प्रश्नावर सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी औरंगाबादला जाऊन केलेल्या मध्यस्थीनंतर मुंडे यांनी हे उपोषण सोडलंय. कदम यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन मुंडे यांनी उपोषण सोडलं. आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडेंना फोन करून उपोषण सोडण्याचं आवाहन केलं होतं. दुष्काळी भागातल्या जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावा, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा, अशा वेगवेगळ्या 13 मागण्यांसाठी मुंडेंचं उपोषण सुरू होतं. मुंडेंच्या 13 पैकी 11 मागण्य मान्य करण्यात आल्यानंतर त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:34 PM IST

गोपीनाथ मुंडेंनी सोडलं उपोषण

09 एप्रिल

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद इथं सोमवारपासून दुष्काळाच्या प्रश्नावर सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी औरंगाबादला जाऊन केलेल्या मध्यस्थीनंतर मुंडे यांनी हे उपोषण सोडलंय. कदम यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन मुंडे यांनी उपोषण सोडलं. आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडेंना फोन करून उपोषण सोडण्याचं आवाहन केलं होतं. दुष्काळी भागातल्या जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावा, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा, अशा वेगवेगळ्या 13 मागण्यांसाठी मुंडेंचं उपोषण सुरू होतं. मुंडेंच्या 13 पैकी 11 मागण्य मान्य करण्यात आल्यानंतर त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2013 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close