S M L
  • 'अजित पवारांनी आमच्या भावना दुखावल्या'

    Published On: Apr 8, 2013 11:07 AM IST | Updated On: May 14, 2013 03:54 PM IST

    08 एप्रिलउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये झालेल्या सभेत मुंबईतील आझाद मैदानात उजनीच्या पाण्यासाठी 45 दिवसांपासून धरणं आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली होती. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे या आंदोलकांना धक्काच बसला. ज्या उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही मुंबईत आंदोलन सुरू केलं. आजपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 50 निवदेन देण्यात आली. पण त्यांनी आमची दखल तर घेतली नाहीच पण आमची खिल्ली उडवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यांनी निदान आमच्या महिलांचा तरी विचार करायला हवा होता. आम्ही हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन केलं त्यात आमचं काय चुकलं ? असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला. तसंच अजित पवार यांच्या वक्तव्यांचा आंदोलक शेतकर्‍यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close