S M L

अजित पवारांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

10 एप्रिलमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत आजही गदारोळ झाला आणि त्यानंतर दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा धारण करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. ते या मागणीवर ठाम राहिले. विरोधक आक्रमक झाल्यानं प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा लागला. अजित पवारांच्या वक्तव्यावर चर्चा करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असा आग्रह विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी धरला होता. पण मुख्यमंत्र्यांनी माफी मागू नये असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर येतोय त्यामुळे विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:29 PM IST

अजित पवारांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

10 एप्रिल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत आजही गदारोळ झाला आणि त्यानंतर दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा धारण करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. ते या मागणीवर ठाम राहिले. विरोधक आक्रमक झाल्यानं प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा लागला. अजित पवारांच्या वक्तव्यावर चर्चा करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असा आग्रह विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी धरला होता. पण मुख्यमंत्र्यांनी माफी मागू नये असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर येतोय त्यामुळे विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close