S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • प्रशासनाची कमाल,मुख्यमंत्र्यांनाच दाखवले दारिद्र्य रेषेखाली !
  • प्रशासनाची कमाल,मुख्यमंत्र्यांनाच दाखवले दारिद्र्य रेषेखाली !

    Published On: Apr 9, 2013 11:37 AM IST | Updated On: May 14, 2013 03:35 PM IST

    09 एप्रिलअमरावतीच्या अन्न व नागरी पुरवठा विभागानं चक्क मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावानं पिवळं रेशनकार्ड मंजूर केलं आहे. पिवळं रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालच्या नागरिकांना दिलं जातं. लोकमत वृत्तपत्रानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झाली. या रेशन कार्डाच्या शेवटच्या पानावर चव्हाण यांच्या कुटुंबातल्या सहा सदस्यांची नोंद आहे. त्यामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, अमरावतीचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची नावे आहेत. मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य अमरावतीत काँग्रेसनगर भागात आहे असं या रेशन कार्डात म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close