S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळाने होरपळली जनता, आमदारावर उडवला लाखो पैसा !
  • दुष्काळाने होरपळली जनता, आमदारावर उडवला लाखो पैसा !

    Published On: Apr 9, 2013 01:25 PM IST | Updated On: May 14, 2013 03:34 PM IST

    09 एप्रिलराज्यात दुष्काळाच्या झळांनी जनता होरपळून निघत आहे मात्र दुसरीकडे जनतेचे लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात चिखलीचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. राहुल बोंन्द्रे यांना खुश करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'एक शाम आमदार राहुल भाऊ के नाम' या कवालीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात आमदारांवर हजारों रुपयांचा पाऊस पाडला. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आमदारावर पैशांची उधळण करण्याच्या या कृतीचा भारतीय जनता युवा मोर्चाने निषेध केला. माजी नगरपालिका उपाध्यक्ष रफिक शेख कुरेशी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मध्यरात्री उशिरापर्यंत हा 'प्रोगाम' सुरु होता. आणि तोही राहुल ब्रोंद्रे यांच्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यितक अझिम नवाझ राही हे स्वता आमदारावंर पैसे उधळताना दिसत आहेत. राही यांच्या दहावी आणि एम ए अभ्यासक्रमात कवितांचा समावेश आहे. व्यवहारांचा काळा घोडा हा त्यांचा सुप्रसिध्द कवितासंग्रह आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close