S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबाद महापालिकेच्या सभेत राडा, नगरसेवक जखमी
  • औरंगाबाद महापालिकेच्या सभेत राडा, नगरसेवक जखमी

    Published On: Apr 12, 2013 12:22 PM IST | Updated On: May 14, 2013 03:12 PM IST

    12 एप्रिलऔरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड गंभीर जखमी झालेत. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झालीय. सभागृहात समांतर जलवाहिनीवर चर्चा सुरू झाल्यावर विरोधक आक्रमक होताच महापौरांनी सभा गुंडाळण्याचे आदेश दिले. त्याचा विरोध म्हणून काँग्रेस नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. हा राजदंड काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या डोक्याला लागल्यानं रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तातडीनं शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, राठोड यांनी मात्र आपल्याला कुणी तरी मारहाण केल्याचा आरोप केला. गोंधळ सुरू असताना कुणीतरी फायटरनं डोक्याला मारल्याचा आरोप राठोड यांनी केला. महापौरांनी हा अपघात असल्याचं सांगितलंय तर काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळात राठोड यांना लागल्याचं सांगितलंय. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा नगरसेवकांच्या हुल्लडबाजीचा प्रकार औरंगाबादकरांना पहायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close