S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नुकसान भरपाई मदतीसाठी शेतकर्‍यांनी पेटवल्या फळबागा
  • नुकसान भरपाई मदतीसाठी शेतकर्‍यांनी पेटवल्या फळबागा

    Published On: Apr 12, 2013 12:18 PM IST | Updated On: May 14, 2013 03:13 PM IST

    12 एप्रिलमराठवाड्यात दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍याची राज्य सरकारने थट्टा चालवलेय आणि आज याचे तीव्र पडसाद मराठवाड्यात उमटले. केंद्राने 13 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारला दुष्काळमदत निधी म्हणून 1 हजार 207 कोटी रुपयांची रक्कम दिली. परंतु सरकारने मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांसाठी एकरी फक्त 3 हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. ही मदत एकरी 2 लाखांची हवी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. एक महिना उलटला तरीही दुष्काळात बागा करपलेल्या शेतकर्‍यांना सरकारने एक रुपयाचीही नुकसान भरपाई दिलेली नाही. 2011 पासून दुष्काळात करपणार्‍या या बागंामुळे शेतकर्‍याची पिढीच्या पिढी उध्वस्त होतीय. याबद्दल सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबादमधल्या साजखेडा गावात मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या कपपलेल्या फळबागा पेटवून दिल्या. केवळ टँकर पाठवून दुष्काळाचं निवारण होत नाही, मोसंबी, सीताफळ, चिकूच्या बागा करपलेल्या शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close