S M L

उजनीत भामा-आचखेड आणि आंद्रा धरणातून पाणी सोडले

10 एप्रिलदुष्काळात होरपळणार्‍या सोलापूरकरांना आज काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आज पुण्यातल्या भामा-आचखेड आणि आंद्रा धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्यात आलं. दुष्काळात होरळपणार्‍या सोलापूरच्या जनतेला पाणी मिळावं यासाठी सोलापूर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर 66 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. काल हायकोर्टाने 24 तासांत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. ऍड. चौधरी यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. कोर्टाने आपल्याला न्याय दिल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:24 PM IST

उजनीत भामा-आचखेड आणि आंद्रा धरणातून पाणी सोडले

10 एप्रिल

दुष्काळात होरपळणार्‍या सोलापूरकरांना आज काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आज पुण्यातल्या भामा-आचखेड आणि आंद्रा धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्यात आलं. दुष्काळात होरळपणार्‍या सोलापूरच्या जनतेला पाणी मिळावं यासाठी सोलापूर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर 66 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. काल हायकोर्टाने 24 तासांत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. ऍड. चौधरी यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. कोर्टाने आपल्याला न्याय दिल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close