S M L
  • राजू शेट्टींनी दिले मनसेसोबत युतीचे संकेत

    Published On: Apr 11, 2013 03:03 PM IST | Updated On: May 14, 2013 03:17 PM IST

    11 एप्रिलस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहे. याबाबत राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झालेली नाही, पण कार्यकर्त्यांची ही युती करण्याबाबत मानसिकता असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी मागे कांद्याच्या प्रश्नी एकत्र आंदोलन केलं. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे की दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी. पण याबद्दल कोणतीही बैठक झाली. कार्यकर्त्यांचा आदर ठेवून कदाचित युतीचा विचार आम्ही करू शकतो असं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close