S M L

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस ?

10 एप्रिलभारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यासाठी आज दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं नाव या चर्चेत सर्वात आघाडीवर असल्याचं कळतंय. लवकरच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि सरचिटणीस यांच्या दरम्यान ही बैठक झाली.नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे राज्यातही भाजपमध्ये फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपच्या गोटातून मिळत होते. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी नेते विनोद तावडेंच्या बंगल्यावर फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. गडकरींचं अध्यक्षपद गेल्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पदावर टांगती तलवार आहे, असं म्हटलं जातंय. पण मुंडे गट मात्र त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन्ही गटांना मंजूर असलेलं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नावही चर्चेत आलं. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गटाला मात्र 2014 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्षपदी आपला माणूस असावा असं वाटतंय. अगदीच हे शक्य झालं नाही तर किमान देवेंद्र फडणवीसांसारख्या दोन्ही गटाला मान्य असलेल्या नेत्याला या पदावर बसवावे यासाठी मुंडे गट प्रयत्नशील आहे.नेहमीच्या प्रथेप्रमाणे या वेळीही प्रदेशाध्यक्षपदाची निवड एकमताने पार पडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:22 PM IST

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस ?

10 एप्रिल

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यासाठी आज दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं नाव या चर्चेत सर्वात आघाडीवर असल्याचं कळतंय. लवकरच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि सरचिटणीस यांच्या दरम्यान ही बैठक झाली.

नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे राज्यातही भाजपमध्ये फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपच्या गोटातून मिळत होते. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी नेते विनोद तावडेंच्या बंगल्यावर फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. गडकरींचं अध्यक्षपद गेल्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पदावर टांगती तलवार आहे, असं म्हटलं जातंय. पण मुंडे गट मात्र त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन्ही गटांना मंजूर असलेलं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नावही चर्चेत आलं. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गटाला मात्र 2014 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्षपदी आपला माणूस असावा असं वाटतंय. अगदीच हे शक्य झालं नाही तर किमान देवेंद्र फडणवीसांसारख्या दोन्ही गटाला मान्य असलेल्या नेत्याला या पदावर बसवावे यासाठी मुंडे गट प्रयत्नशील आहे.नेहमीच्या प्रथेप्रमाणे या वेळीही प्रदेशाध्यक्षपदाची निवड एकमताने पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close