S M L
  • अनधिकृत बांधकाम पाडा पण..-शरद पवार

    Published On: Apr 13, 2013 11:34 AM IST | Updated On: May 14, 2013 03:01 PM IST

    13 एप्रिलमुंब्रा इथं इमारत दुर्घटनेप्रकरणाबद्दलही पवारांनी आपलं मत मांडलं. ठाण्यात जवळपास 70 टक्के अनधिकृत बांधकाम आहे असं सांगितलं जात आहे. अशी जर परिस्थिती असेल तर या प्रकरणाकडे प्रशासनाने पाहिले पाहिजे. मी राज्य सरकारकडे विनंती करतो, ज्यांचे बेकायदेशीर बांधकाम असेल मग तो विधासभेचा सदस्य असो अथवा आमच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड असो त्यांचे बांधकाम पाडले पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली. ही मागणी करत असताना पवारांनी बेकायदेशीर इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांचाही विचार करायला हवा अशी सुचनाही केली. तसंच आयपीएलच्या सामन्यांसाठी मैदानावर पाण्याचा अपव्यय होतं आहे अशी ओरड केली जात होती. मग पालिका प्रशासनने याची खबरदारी घेत शहरातील सगळ्याचं बागांमध्ये पाणीपुरवठा बंद करावा असा टोलाही पवारांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close