S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • माणुसकीचा 'दुष्काळ',दलितांना भरू दिलं जात नाही पाणी !
  • माणुसकीचा 'दुष्काळ',दलितांना भरू दिलं जात नाही पाणी !

    Published On: Apr 17, 2013 03:03 PM IST | Updated On: May 14, 2013 02:29 PM IST

    17 एप्रिलजालना : मराठवाड्यात दुष्काळाचे चटके सगळ्यांनाच सहन करावे लागतायेत, पण काहीजण मात्र या दुष्काळाच्या धगीमध्ये होरपळून निघत आहेत. जालना जिल्ह्यातल्या गौदी वैतागवाडी गावात दलितांचे तर या दुष्काळात खूपच हाल होतायत. पाण्याची कमतरता तर आहेच. पण, आजही अस्तित्वात असलेल्या जातीभेदामुळे इथल्या दलित महिलांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिलं जात नाहीय. एवढंच नाही तर पाण्याचा टँकर आला तरी ते पाणीही यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या महिलांची भांडी फेकून दिली जाता.आता आम्ही पाणी कुणाकडं मागावं, हा सवाल या महिला करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते, तर दुसरीकडे सगळ्यांचा समान हक्क असलेल्या पाण्यापासूनसुध्दा या महिलांना दूर ठेवलं जातंय.या महिलांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close