S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सिंधुदुर्गात इन्सुली सूतगिरणीचा लिलाव बेकायदेशीर ?
  • सिंधुदुर्गात इन्सुली सूतगिरणीचा लिलाव बेकायदेशीर ?

    Published On: Apr 19, 2013 03:10 PM IST | Updated On: May 14, 2013 02:25 PM IST

    दिनेश केळुसकर, रत्नागिरी19 एप्रिलराज्य सहकारी बँकेनं कर्जवसुलीपोटी सिंधुदुर्गातल्या इन्सुली सूतगिरणीच्या जमिनीचा केलेला लिलाव बेकायदेशीर आहे आणि या लिलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या सूतगिरणीला जमीन देणारे शेतकरी करत आहे. आपले हक्क डावलून सत्यम डेव्हलपर्स या बिल्डरला देण्यात आलेली ही जमीन आपल्याला परत मिळावी यासाठी इथल्या शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन छेडलंय.कायम स्वरुपी रोजगाराच्या आश्वासनामुळे इन्सुलीतल्या 135 शेतकर्‍यांनी 1977 साली अवघ्या 40 ते 50 रुपये एकरी दराने आपली 125 एकर सामायिक जमीन रत्नागिरी कोऑप्रेटीव्ह स्पिनिंग मिलला दिली. राज्य सहकारी बँकेच्या कर्जातून उभी राहिलेल्या या मिलचा ताबा 1992 साली प्रकाश आवाडे यांच्याकडे गेल्यानंतर फक्त चार वर्षातच ही मिल पूर्णपणे बंद पडली. बंद पडलेल्या या मिलच्या कर्जापोटी राज्य सहकारी बँकेनं 1999 साली या संपूर्ण जमिनीचं तारण गहाण खत केलं. सप्टेंबर 2007 ला 6 कोटी तीस लाखाच्या कर्जाची ही जमीन लिलावानं सत्यम डेव्हलपर्स ला फक्त 2 कोटी 30 लाखात दिली. मात्र हा संपूर्ण लिलाव बेकायदेशीर असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय.लिलाव प्रक्रियेतील बेकायदेशीर बाबी1: मूळ खरेदी खतातला शेतकर्‍यांचा राईट ऑफ प्रीऍम्प्शनचा हक्क डावलून लिलाव 2: 10 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असूनही लिलावाला औद्योगिक विकास आयुक्त आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नाही3: लिलावापूर्वीच दोन महिने सत्यम डेव्हलपर्सकडून एक लाख 94 हजार 688 रुपयांचा बिनशेती कर जमा 4: केंद्र शासनाच्या विक्री कराचे 11 कोटी 76 लाख 6 हजार आणि कामगारांचे 8 लाख अजूनही थकीत5 : इंडस्ट्रीअल झोन असूनही सावंतवाडी तहसिलदारांकडून सत्यम डेव्हलपर्सला संपूर्ण जमिनीची निवासी कारणासाठी परवानगी 6 : लिलावानंतरही जमिनीचा सातबारा मिलच्याच नावानं कामकाजात आज जमिनी ज्या कमी दरात खरेदी केल्यात आणि ज्या शेतक-यांनी आपली मुलं रोजगाराला लागतील आपलं घर चालवतील या उद्देशाने ज्या जमिनी दिल्यायत त्या लोकांवरती आज उपासमारीची पाळी आलीय.आणि त्यांच्या जमिनींचा वापर ज्या कारणासाठी व्हायला पाहिजे तो न होता अन्य फ़ायद्यासाठी होत असल्यामुळे त्यांना न्याय हा मिलालाच पाहिजे अशी मागणी शेतकरी स्मिता वागळे करतायत.सूतगिरणीची कोट्यवधी रुपयांची ही जमीन शिखर बँकेकडून अत्यंत कमी किमतीत लिलावात काढण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांचा हात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close