S M L
  • 'बाबा'तर निष्क्रिय, 'दादां'ची हकालपट्टी करा'

    Published On: Apr 20, 2013 03:21 PM IST | Updated On: May 14, 2013 02:22 PM IST

    20 एप्रिलमाणगाव : दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रायगड जिल्ह्यामध्ये माणगावमध्ये त्यांनी सभा घेतली. अजित पवारांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांना यशवंतरावांनी कधीच माफ केलं नसतं. आता अजित पवारांना म्हणे, मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात. पण मुख्यमंत्री कसे होणार ? लोकं तरी येतील का तुमच्याकडे. पाणी समजून काय देतील याचा भरोस नाही असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. शरद पवार यांच्यावर घराणेशाहीचा आरोप त्यांनी केला. शरद पवारांनी यशवंतराव आणि वसंतदादांच्या पाठीत सुरा खुपसला, ज्या यशवंतरावांनी पवारांना हात धरून राजकारणात आणलं त्यांनाच पवारांनी शेवटच्या काळात सोडून दिलं, यशवंतरावांना शेवटचं आयुष्य विपन्नावस्थेत आणि मानहानीत काढावं लागलं अशी विखारी टीकाही उद्धव यांनी शरद पवारांवर केली. तसंच उद्धव यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांकडं तक्रार नोंदवली तर नुसत्या चौकशीच आश्वासन देता पण कधीच चौकशी होतं नाही. यामुळे मुख्यमंत्री निष्क्रिय ठरले आहे अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव इथं उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close