S M L
  • 'विशालयुती'ला फडणवीसांची 'टाळी'

    Published On: Apr 23, 2013 11:24 AM IST | Updated On: May 14, 2013 02:15 PM IST

    मुंबई (23 एप्रिल 13):शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीत येण्यासाठी राज ठाकरे यांना 'टाळी' देण्यासाठी हात पुढे केला होता. मात्र राज यांनी नकार देत 'टोला' लगावला होता. दुसरीकडे भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनीही भविष्यात मनसे सोबत येतील असं भाकित वर्तवलंय. आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही विशालयुतीला 'नाहरकत प्रमाणपत्र' देऊ केलं आहे. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. यावेळी मनसे हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे राज्यात काही ठिकाणी मनसेला युतीने साथ दिली आहे. सध्या महायुती आणखी मजबूत करण्याचं आवाहन आमच्या समोर आहे. पण उद्या जर भाजपच्या संसदीय समितीने मनसेला सोबत घेण्याचं मान्य केलं तर मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यास काहीही हरकत नाही. पण शिवसेनेचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय घेतात यावर अवलंबून आहे असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. तसंच विरोधी पक्ष एका गटात राहून लढावे यासाठी मी सगळ्या पक्षांसोबत चर्चा करणार आहे. यासाठी राष्ट्रीय विचारसरणीचे जेवढे विरोधी पक्ष आहे त्यांच्याशी संवाद साधणार असंही फडणवीस यांनी सांगितलं.मुंडे-गडकरी यांच्यात मनभेद नाहीत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात मतभेद होते. हे आम्ही मान्य करतो पण मतभेद जरी असले तरी मनभेद नाही. पक्षात मनभेद दूर करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. प्रदेशध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी नितिन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी एकमत करून माझ्या नावाची सुचना राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली. त्यांच्या एकमतामुळे मी आज प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो. दोघेही नेते एकमेकांसाठी पुरक आहे. भाजप पक्षाचा सामाजिक चेहरा सर्वसामान्यामध्ये रुजवला ते गोपीनाथ मुंडे आहे. तर पक्षाला विकासाचा चेहरा दिला आहे तो नितीन गडकरी यांनी त्यामुळे पक्षाला सामाजिक आणि विकासाचा चेहरा मिळाला आहे याबळावरच पक्ष सत्तेत येऊ शकतो असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाडणारच !आमच्या पक्षातून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून आघाडी सरकार पाडायचे नाही. सत्तेचा जो माज असतो तो आघाडी सरकारमध्ये आहे. त्यांना असं वाटतं आम्ही अमरतृव घेऊन आलोय, आम्ही काहीही केलं तरी जनता काही करणार नाही हा त्यांचा गैरसमज हाणून पाडायचा आहे. आणि महाराष्ट्रात जनताभिमुख सरकार देणं हे माझं ध्येय आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close