S M L

दारुड्याने बस पेटवली, 2 जणांचा मृत्यू

13 एप्रिलअमरावती : इथं तिवसा-चांदूर मार्गावर एका दारुड्यानं चक्क एका बसलाच आग लावली. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. चांदूर रेल्वे आगाराच्या या बसमध्ये विजय मोहतुले हा दारुडा प्रवासी पेट्रोलचा कॅन घेऊन चढला. बसमध्ये त्याचा कंडक्टरशी वाद झाला. आणि काही कळायच्या आत या दारुड्याने बसमध्ये पेट्रोलचा कॅन ओतून काडी पेटवली. त्यामुळे बसनं पेट घेतला त्यात मोहतुलेचा मृत्यू झाला. तर विजयता चौधरी या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर 17 जण जखमी झाले. जखमींना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झालीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:01 PM IST

दारुड्याने बस पेटवली, 2 जणांचा मृत्यू

13 एप्रिल

अमरावती : इथं तिवसा-चांदूर मार्गावर एका दारुड्यानं चक्क एका बसलाच आग लावली. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. चांदूर रेल्वे आगाराच्या या बसमध्ये विजय मोहतुले हा दारुडा प्रवासी पेट्रोलचा कॅन घेऊन चढला. बसमध्ये त्याचा कंडक्टरशी वाद झाला. आणि काही कळायच्या आत या दारुड्याने बसमध्ये पेट्रोलचा कॅन ओतून काडी पेटवली. त्यामुळे बसनं पेट घेतला त्यात मोहतुलेचा मृत्यू झाला. तर विजयता चौधरी या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर 17 जण जखमी झाले. जखमींना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2013 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close