S M L

'कर्नाटक सरकारने गृहमंत्र्यांविरोधातला गुन्हा मागे घ्यावा'

16 एप्रिलगृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत निवेदन केलं. आर आर पाटील यांच्याविरोधातला गुन्हा मागे घेण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापूर्वी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकचे गृहमंत्री आणि डीजीपी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. कर्नाटकात आर.आर.पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याविरोधात हा हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. बेळगावमध्ये किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात आबांनी भाषण केलं होतं. या भाषणात आबांनी बेळगावातून मराठी लोकांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या भाषणामुळे मराठी आणि कानडी भाषकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:59 PM IST

'कर्नाटक सरकारने गृहमंत्र्यांविरोधातला गुन्हा मागे घ्यावा'

16 एप्रिल

गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत निवेदन केलं. आर आर पाटील यांच्याविरोधातला गुन्हा मागे घेण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापूर्वी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकचे गृहमंत्री आणि डीजीपी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. कर्नाटकात आर.आर.पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याविरोधात हा हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. बेळगावमध्ये किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात आबांनी भाषण केलं होतं. या भाषणात आबांनी बेळगावातून मराठी लोकांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या भाषणामुळे मराठी आणि कानडी भाषकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2013 08:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close