S M L

मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का ? -शिवसेना

17 एप्रिलएनडीए आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान पदाच्या नावावरून सुरू असलेल्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातल्या अग्रलेखात आज भाजपला सेनंनं खडे बोल सुनावले. एनडीएची बैठक बोलावून एकदाचा घोळ संपवून टाका असंही शिवसनेनं बजावलंय. पंतप्रधान पदाचा निर्णय भाजप एकटा घेऊ शकत नाही. कुणा एकाचं नाव पुढं करून पाच दहा जागांचा फायदा होईल मात्र जुने मित्र दूर जावून जास्त जागांचं नुकसान होईल असा इशाराही सेनेनं दिला. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून एनडीए तुटत असेल तर तो जागतिक विक्रम होईल, असं होणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असं होईल अशी खिल्लीही उडवण्यात आलीय. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाने गळा काढत असताना भाजपचेच काही ज्येष्ठ नेते आता लालकृष्ण आडवानींचं नाव पुढं करत आहेत. तसंच बाळासाहेब असताना शिवसेनेनं सुषमा स्वराज यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता, आता मात्र सावध भूमिका घेत जनतादल युनायटेड सारखाचं भाजपवर दबाव वाढवण्याचा हा शिवसेनेचे डावपेच असल्याचं स्पष्ट होतंय. सामनात काय म्हटलंय ?'निवडणुकीआधीच पंतप्रधानपदावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चिरफळ्या उडत असतील तर तो एक जागतिक विक्रमच ठरावा! 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' अशी एक मराठी भाषेत म्हण आहे. मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खरोखरच आहेत काय? याबाबत भाजपच्या धुरिणांनी एकदाच काय ते सांगून उमेदवाराचा घोळ संपवायला हवा. पंतप्रधानपदाबाबत 'यूपीए'च्या पोटात एक आणि ओठात दुसरेच असेलही, पण आज तरी ते पुन्हा एकदा मनमोहन सिंगांच्या मागे उभे आहेत. एखाद्याच्या उमेदवारीमुळे पाच-दहा जागांची वाढ होईल, पण इतकी वर्षं निष्ठेनं साथसंगत करणारे मित्रपक्ष दूर होतील व पाच-पंचवीस जागांचा फटका बसेल.'

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:31 PM IST

मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का ? -शिवसेना

17 एप्रिल

एनडीए आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान पदाच्या नावावरून सुरू असलेल्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातल्या अग्रलेखात आज भाजपला सेनंनं खडे बोल सुनावले. एनडीएची बैठक बोलावून एकदाचा घोळ संपवून टाका असंही शिवसनेनं बजावलंय. पंतप्रधान पदाचा निर्णय भाजप एकटा घेऊ शकत नाही. कुणा एकाचं नाव पुढं करून पाच दहा जागांचा फायदा होईल मात्र जुने मित्र दूर जावून जास्त जागांचं नुकसान होईल असा इशाराही सेनेनं दिला. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून एनडीए तुटत असेल तर तो जागतिक विक्रम होईल, असं होणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असं होईल अशी खिल्लीही उडवण्यात आलीय. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाने गळा काढत असताना भाजपचेच काही ज्येष्ठ नेते आता लालकृष्ण आडवानींचं नाव पुढं करत आहेत. तसंच बाळासाहेब असताना शिवसेनेनं सुषमा स्वराज यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता, आता मात्र सावध भूमिका घेत जनतादल युनायटेड सारखाचं भाजपवर दबाव वाढवण्याचा हा शिवसेनेचे डावपेच असल्याचं स्पष्ट होतंय.

सामनात काय म्हटलंय ?

'निवडणुकीआधीच पंतप्रधानपदावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चिरफळ्या उडत असतील तर तो एक जागतिक विक्रमच ठरावा! 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' अशी एक मराठी भाषेत म्हण आहे. मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खरोखरच आहेत काय? याबाबत भाजपच्या धुरिणांनी एकदाच काय ते सांगून उमेदवाराचा घोळ संपवायला हवा. पंतप्रधानपदाबाबत 'यूपीए'च्या पोटात एक आणि ओठात दुसरेच असेलही, पण आज तरी ते पुन्हा एकदा मनमोहन सिंगांच्या मागे उभे आहेत. एखाद्याच्या उमेदवारीमुळे पाच-दहा जागांची वाढ होईल, पण इतकी वर्षं निष्ठेनं साथसंगत करणारे मित्रपक्ष दूर होतील व पाच-पंचवीस जागांचा फटका बसेल.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2013 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close