S M L

आ.क्षितिज ठाकूर-राम कदम यांच्यासह सुर्यवंशी दोषी

18 एप्रिलमुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी गणपतराव देशमुख समितीचा अहवाल आज विधानसभेत सादर केला. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम आणि पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना दोषी धरण्यात आलंय. आमदार प्रदीप जयस्वाल, राजन साळवी आणि जयकुमार रावल यांना निर्दोष ठरवण्यात आलंय. या तिघांचं निलंबन तात्काळ मागे घेण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय. आमदार राम कदम, क्षितिज ठाकूर यांचा मारहाणीत प्रत्यक्ष सहभाग आहे. पण त्यांचं निलंबन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मागे घेण्याची शिफारस अहवालात केलीय. तसंच सचिन सूर्यवंशींना झालेली मारहाण गंभीर नव्हती. सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षीत हे उघड झालंय. मारहाणीचं चित्र रंगवून दाखवण्यात आलं, असं अहवालात म्हटलं आहे. सचिन सूर्यवंशी यांच्या अरेरावीमुळे प्रकरण चिघळलं. त्यामुळे त्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आलीय. पण, अहवालानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. मारहाणीचं प्रकरण घडलं. त्यात पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी जनतेची माफी मागितली. चौकशी झाली. पण, अहवालात मात्र सर्व काही आलबेल असल्याचा आव आणण्यात आलाय. हा अहवाल विधानसभेत मांडला गेल्यानंतर सुद्धा तो जनतेसाठी का खुला केला गेला नाही, याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही. दरम्यान, तीन आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या शिफारशीवर कुठल्याच प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तिघांचंही निलंबन कायम आहे. पावसाळी अधिवेशनात ते मागे घेतलं जाण्याची शक्याता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 03:05 PM IST

आ.क्षितिज ठाकूर-राम कदम यांच्यासह सुर्यवंशी दोषी

18 एप्रिल

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी गणपतराव देशमुख समितीचा अहवाल आज विधानसभेत सादर केला. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम आणि पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना दोषी धरण्यात आलंय. आमदार प्रदीप जयस्वाल, राजन साळवी आणि जयकुमार रावल यांना निर्दोष ठरवण्यात आलंय. या तिघांचं निलंबन तात्काळ मागे घेण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.

आमदार राम कदम, क्षितिज ठाकूर यांचा मारहाणीत प्रत्यक्ष सहभाग आहे. पण त्यांचं निलंबन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मागे घेण्याची शिफारस अहवालात केलीय. तसंच सचिन सूर्यवंशींना झालेली मारहाण गंभीर नव्हती. सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षीत हे उघड झालंय. मारहाणीचं चित्र रंगवून दाखवण्यात आलं, असं अहवालात म्हटलं आहे. सचिन सूर्यवंशी यांच्या अरेरावीमुळे प्रकरण चिघळलं. त्यामुळे त्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आलीय. पण, अहवालानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. मारहाणीचं प्रकरण घडलं. त्यात पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी जनतेची माफी मागितली. चौकशी झाली. पण, अहवालात मात्र सर्व काही आलबेल असल्याचा आव आणण्यात आलाय. हा अहवाल विधानसभेत मांडला गेल्यानंतर सुद्धा तो जनतेसाठी का खुला केला गेला नाही, याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही. दरम्यान, तीन आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या शिफारशीवर कुठल्याच प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तिघांचंही निलंबन कायम आहे. पावसाळी अधिवेशनात ते मागे घेतलं जाण्याची शक्याता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2013 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close