S M L

नागपुरात तीन ठिकाणी गोळीबार, 1 जणांचा मृत्यू

18 एप्रिलनागपूर : इथं गेल्या 12 तासाच्या काळात गोळीबाराच्या तीन घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थीतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या मध्यवर्ती भागातील उंटखाना परिसरात मैत्रिणीवर अश्लील शेरेबाजी करणार्‍या तीन तरुणांना जाब विचारणार्‍या रोशनला गुंडानी गोळ्या घातल्या. इंजिनियरींगचा विद्यार्थी असणार्‍या रोशन समरीतचा या घटनेत मृत्यू झाला. भर रस्त्यात शेकडो लोकांसमोर हल्लेखोर पसारही झाले. मागील दोन वर्षांमध्ये अशा घटना वाढल्या आहे. त्यामुळे नाहक लोकांचे बळी जात आहेत. शहरात बेकायदा शस्त्र मिळवणे किती सोपे आहे आणि बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई मात्र शुन्य आहे हे याच घटनांमधून स्पष्ट होतंय.उंटखान्यातील गोळीबाराच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नंदनवन परिसरातील जगनाडे परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असतांना तीन शुर्टर्सनी पोलिसांवर फायरिंग केले. या घटनेत तीन पोलीस काँस्टेबल जखमी झाले. या दोन घटना ताज्या असतांना गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास टेक नाका परिसरात एका गुंडाने हवेत फायरींग केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मोनिका किरणापुरे हत्या प्रकरण, मानेवाड्यातील प्राध्यापकांचा घरी घुसून हत्या प्रकरण, तर भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवार यांचा खून या एकापाठोपाठ घडलेल्या प्रकरणांमध्ये अवैध शस्त्रांचा वापर झाला आहे. शहरात अवैध शस्त्र उपलब्ध करुन देणारे दलाल सक्रीय आहे. कोळसा खाणींच्या परिसरातील माफीयांपर्यंत या धंद्याचे धागेदोरे आहेत पण कारवाई शुन्य. नागपूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांमधील या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुली आणि स्त्रीयांवरील हल्ल्यातही वाढ झाली आहे. आता पोलिसांवरच हल्ले होत असतांना बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 03:04 PM IST

नागपुरात तीन ठिकाणी गोळीबार, 1 जणांचा मृत्यू

18 एप्रिल

नागपूर : इथं गेल्या 12 तासाच्या काळात गोळीबाराच्या तीन घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थीतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या मध्यवर्ती भागातील उंटखाना परिसरात मैत्रिणीवर अश्लील शेरेबाजी करणार्‍या तीन तरुणांना जाब विचारणार्‍या रोशनला गुंडानी गोळ्या घातल्या. इंजिनियरींगचा विद्यार्थी असणार्‍या रोशन समरीतचा या घटनेत मृत्यू झाला. भर रस्त्यात शेकडो लोकांसमोर हल्लेखोर पसारही झाले. मागील दोन वर्षांमध्ये अशा घटना वाढल्या आहे. त्यामुळे नाहक लोकांचे बळी जात आहेत. शहरात बेकायदा शस्त्र मिळवणे किती सोपे आहे आणि बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई मात्र शुन्य आहे हे याच घटनांमधून स्पष्ट होतंय.

उंटखान्यातील गोळीबाराच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नंदनवन परिसरातील जगनाडे परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असतांना तीन शुर्टर्सनी पोलिसांवर फायरिंग केले. या घटनेत तीन पोलीस काँस्टेबल जखमी झाले. या दोन घटना ताज्या असतांना गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास टेक नाका परिसरात एका गुंडाने हवेत फायरींग केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मोनिका किरणापुरे हत्या प्रकरण, मानेवाड्यातील प्राध्यापकांचा घरी घुसून हत्या प्रकरण, तर भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवार यांचा खून या एकापाठोपाठ घडलेल्या प्रकरणांमध्ये अवैध शस्त्रांचा वापर झाला आहे. शहरात अवैध शस्त्र उपलब्ध करुन देणारे दलाल सक्रीय आहे. कोळसा खाणींच्या परिसरातील माफीयांपर्यंत या धंद्याचे धागेदोरे आहेत पण कारवाई शुन्य.

नागपूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांमधील या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुली आणि स्त्रीयांवरील हल्ल्यातही वाढ झाली आहे. आता पोलिसांवरच हल्ले होत असतांना बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2013 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close