S M L

राजकारणाचा बळी, कर्तव्यदक्ष अधिकारी श्वेता सिंघल निलंबित

20 एप्रिलहिंगोली : बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या पाठोपाठ आता हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनाही राजकीय नेत्यांच्या आकसाचा सामना करावा लागतोय. शहरात दलित वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन सिंघल यांचं निलंबन करण्यात आलं आहे. याबाबात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणाही केली. विशेष म्हणजे कोणतीही चौकशी न करता ही कारवाई करण्यात आली आहे.श्वेता सिंघल...तडफदार अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी कार्यभार स्विकारल्यापासून अनेक गैरव्यवहार उघड केलेत. आणि प्रशासनावर वचक बसवलाय. यामुळे हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आणि हिंगोलीचे आमदार राजू सातव यांनी श्वेता सिंघल यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी दलित वस्ती निधीचं निमित्त करण्यात आलंय. जिल्ह्यात या निधीचं वाटप झालं नाही, आणि जे वाटप करण्यात आलंय ते अयोग्य झालंय, असा आरोप करत याबाबतचा प्रश्न बळीराम शिरसकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावेळी काँग्रेसच्या इतर आमदारांनी सिंघल यांच्या निलंबनाचीच मागणी केली. आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणाही केली. पण, दलित वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन सिंघल यांचं निलंबन कसं करता येईल, असं सांगत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आधी चौकशी करुन नंतर निलंबन करायचं की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं आश्वासन या प्रकरणात दिलंय. हिंगोलीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि त्यामुळे काँग्रेस राजकारण करुन अधिकार्‍यांना टार्गेट करतंय, असं सांगत शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या निलंबनाच्या घोषणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. श्वेता सिंघल या जिल्ह्यामध्ये कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. राजकीय दबावाला त्या बळी पडत नसल्यानेच त्यांच्या निलंबनाचे प्रयत्न वर्षा गायकवाड आणि राजू सातव यांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सिंघल यांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला. दरम्यान, राजू सातव यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. राजकारणाचा बळी- हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांच्या निलंबनाची घोषणा वादात- आयएएस अधिकार्‍यांना राजकारण्यांनी केलं टार्गेट- शिवाजीराव मोघे यांनी अधिवेशात केली सिंघल यांच्या निलंबनाची घोषणा- शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकार्‍यांना हटवण्याचे काँग्रेस आमदाराचे प्रयत्न- वर्षा गायकवाड आणि राजू सातव यांनी राजकीय दबाव टाकल्याचा आरोप- निलंबनाची घोषणा झाली पण, चौकशी शिवाय निलंबन करणार नाही जयंत पाटील यांचं आश्वासन- पण, निलंबनाची टांगती तलवार कायम- सिंघल यांनी अनेक गैरव्यवहारांना आळा घातलाय- राजकीय दबावापुढे त्या झुकत नाहीत- त्यामुळे आमदारांचा, पालकमंत्र्यांचा त्यांच्यावर आकस

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:22 PM IST

राजकारणाचा बळी, कर्तव्यदक्ष अधिकारी श्वेता सिंघल निलंबित

20 एप्रिल

हिंगोली : बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या पाठोपाठ आता हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनाही राजकीय नेत्यांच्या आकसाचा सामना करावा लागतोय. शहरात दलित वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन सिंघल यांचं निलंबन करण्यात आलं आहे. याबाबात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणाही केली. विशेष म्हणजे कोणतीही चौकशी न करता ही कारवाई करण्यात आली आहे.श्वेता सिंघल...तडफदार अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी कार्यभार स्विकारल्यापासून अनेक गैरव्यवहार उघड केलेत. आणि प्रशासनावर वचक बसवलाय. यामुळे हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आणि हिंगोलीचे आमदार राजू सातव यांनी श्वेता सिंघल यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी दलित वस्ती निधीचं निमित्त करण्यात आलंय. जिल्ह्यात या निधीचं वाटप झालं नाही, आणि जे वाटप करण्यात आलंय ते अयोग्य झालंय, असा आरोप करत याबाबतचा प्रश्न बळीराम शिरसकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावेळी काँग्रेसच्या इतर आमदारांनी सिंघल यांच्या निलंबनाचीच मागणी केली. आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणाही केली.

पण, दलित वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन सिंघल यांचं निलंबन कसं करता येईल, असं सांगत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आधी चौकशी करुन नंतर निलंबन करायचं की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं आश्वासन या प्रकरणात दिलंय. हिंगोलीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि त्यामुळे काँग्रेस राजकारण करुन अधिकार्‍यांना टार्गेट करतंय, असं सांगत शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या निलंबनाच्या घोषणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. श्वेता सिंघल या जिल्ह्यामध्ये कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. राजकीय दबावाला त्या बळी पडत नसल्यानेच त्यांच्या निलंबनाचे प्रयत्न वर्षा गायकवाड आणि राजू सातव यांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सिंघल यांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला. दरम्यान, राजू सातव यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

राजकारणाचा बळी

- हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांच्या निलंबनाची घोषणा वादात- आयएएस अधिकार्‍यांना राजकारण्यांनी केलं टार्गेट- शिवाजीराव मोघे यांनी अधिवेशात केली सिंघल यांच्या निलंबनाची घोषणा- शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकार्‍यांना हटवण्याचे काँग्रेस आमदाराचे प्रयत्न- वर्षा गायकवाड आणि राजू सातव यांनी राजकीय दबाव टाकल्याचा आरोप- निलंबनाची घोषणा झाली पण, चौकशी शिवाय निलंबन करणार नाही जयंत पाटील यांचं आश्वासन- पण, निलंबनाची टांगती तलवार कायम- सिंघल यांनी अनेक गैरव्यवहारांना आळा घातलाय- राजकीय दबावापुढे त्या झुकत नाहीत- त्यामुळे आमदारांचा, पालकमंत्र्यांचा त्यांच्यावर आकस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2013 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close