S M L

'जास्तीचा' प्रवास भत्ता कुलगुरूंना पडला महागात

22 एप्रिलअमरावती : येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर यांच्या प्रवास भत्त्याचं प्रकरण अंगलट आलंय. त्यामुळे त्यांनी प्रवास भत्त्यापोटी अवैधरित्या उचलेली 75 हजारांची रक्कम विद्यापीठाला परत केली आहे. माहितीच्या अधिकारा अंर्तगत ही बाब लक्षात आल्यानंतर 8 महिन्यांनी ही रक्कम त्यांनी भरलीय. विधान सभेतही याबाबत तारांकित प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी नियमानुसार पैसे उचलल्याचं कुलगुरुंनी सांगितलं होतं. नियुक्तीच्या 6 महिन्यांनतर खेडकर यांनी आपण डेप्युटीशनवर असल्याचं दाखवून नागपूर ते अमरावती अशा प्रवासाचं 75 हजारांचं बिल सादर केलं. वित्त विभागाच्या सहाय्यक कुलसचिवांनी बिल मंजूर करणे योग्य नसल्याचा शेरा मारला होता. तरीही लेखा अधिकार्‍यामार्फत बिल मंजूर करून पैसे उचलले होते. याबाबत कुलगुरुंवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:21 PM IST

'जास्तीचा' प्रवास भत्ता कुलगुरूंना पडला महागात

22 एप्रिल

अमरावती : येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर यांच्या प्रवास भत्त्याचं प्रकरण अंगलट आलंय. त्यामुळे त्यांनी प्रवास भत्त्यापोटी अवैधरित्या उचलेली 75 हजारांची रक्कम विद्यापीठाला परत केली आहे. माहितीच्या अधिकारा अंर्तगत ही बाब लक्षात आल्यानंतर 8 महिन्यांनी ही रक्कम त्यांनी भरलीय. विधान सभेतही याबाबत तारांकित प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी नियमानुसार पैसे उचलल्याचं कुलगुरुंनी सांगितलं होतं. नियुक्तीच्या 6 महिन्यांनतर खेडकर यांनी आपण डेप्युटीशनवर असल्याचं दाखवून नागपूर ते अमरावती अशा प्रवासाचं 75 हजारांचं बिल सादर केलं. वित्त विभागाच्या सहाय्यक कुलसचिवांनी बिल मंजूर करणे योग्य नसल्याचा शेरा मारला होता. तरीही लेखा अधिकार्‍यामार्फत बिल मंजूर करून पैसे उचलले होते. याबाबत कुलगुरुंवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close