S M L

तातडीने संप मागे घ्या, हायकोर्टाचे 'मार्ड'ला आदेश

24 एप्रिलमुंबई : गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांना मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारले आहे. सरकारनं मार्डच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत.आता निवासी डॉक्टरांनी संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे. मार्डच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागातील हॉस्पिटल्समधले एक हजार पेक्षा जास्त डॉक्टर्स संपावर आहेत. या संपामुळे मुंबईतील सायन, केईएम आणि नायर हॉस्पिटलमधली रुग्णसेवा कोलमडली आहे. कोर्टाने आदेश देऊनही अजूनही मार्डने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. महाराष्ट्रात एकीकडे प्राध्यापकांच्या संपाचा 80 वा दिवस आहे तर डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. याचा मोठा फटका रूग्णांना बसतोय. राज्यातल्या 15 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, तीन डेंटल कॉलेजमध्ये आणि सहा उपनगरीय हॉस्पिटल्समध्ये मार्डचे डॉक्टर या संपात सहभागी झालेत. मुंबईतल्या सायन, केईएम आणि नायर हॉस्पिटलमधली रुग्णसेवा कोलमडलीय. हा संप नसून हे सामूहिक रजा आंदोलन असल्याचा दावा मार्डनं केला. पण मार्डनं संपाची नोटीस दिली. मार्डच्या या सपाबाबत सरकारने कडक भूमिका घेत इस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा दिला. 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. पण मार्डनं ती अमान्य केलीय. राज्यभरात अगोदरच प्राध्यापक आणि व्यापार्‍यांच्या बंदमुळे नागरीक हैराण झाले असताना त्यात मार्डनेही जखमेवर बोट ठेवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:10 PM IST

तातडीने संप मागे घ्या, हायकोर्टाचे 'मार्ड'ला आदेश

24 एप्रिल

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांना मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारले आहे. सरकारनं मार्डच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत.आता निवासी डॉक्टरांनी संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे. मार्डच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागातील हॉस्पिटल्समधले एक हजार पेक्षा जास्त डॉक्टर्स संपावर आहेत. या संपामुळे मुंबईतील सायन, केईएम आणि नायर हॉस्पिटलमधली रुग्णसेवा कोलमडली आहे. कोर्टाने आदेश देऊनही अजूनही मार्डने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे संपाचा तिढा कायम आहे.

महाराष्ट्रात एकीकडे प्राध्यापकांच्या संपाचा 80 वा दिवस आहे तर डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. याचा मोठा फटका रूग्णांना बसतोय. राज्यातल्या 15 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, तीन डेंटल कॉलेजमध्ये आणि सहा उपनगरीय हॉस्पिटल्समध्ये मार्डचे डॉक्टर या संपात सहभागी झालेत. मुंबईतल्या सायन, केईएम आणि नायर हॉस्पिटलमधली रुग्णसेवा कोलमडलीय. हा संप नसून हे सामूहिक रजा आंदोलन असल्याचा दावा मार्डनं केला. पण मार्डनं संपाची नोटीस दिली. मार्डच्या या सपाबाबत सरकारने कडक भूमिका घेत इस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा दिला. 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. पण मार्डनं ती अमान्य केलीय. राज्यभरात अगोदरच प्राध्यापक आणि व्यापार्‍यांच्या बंदमुळे नागरीक हैराण झाले असताना त्यात मार्डनेही जखमेवर बोट ठेवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close