S M L

शिवसेनेची येडियुरप्पांसमोर निदर्शने

1 एप्रिलबेळगावमध्ये महापौर पद निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटक सरकारने केलेल्या दंडेलीचा निषेध आज मुंबईत शिवसैनिकांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासमोर केला. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येडियुरप्प हॉटेल ताजमध्ये आले होते. त्यावेळी जवळपास 100 शिवसैनिकांनी ताजसमोर निदर्शने केली. शिवसैनिकांनी ताजमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निदर्शकांना रोखले. यात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, बाळा सावंत, दिवाकर रावते, नीलम गोर्‍हे , किरण पावसकर, दीपक सावंत, जी. जी. उपरकर सहभागी झाले. निदर्शकांना रोखण्यासाठी एसआरपीच्या 10 गाड्या रवाना झाल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:57 PM IST

शिवसेनेची येडियुरप्पांसमोर निदर्शने

1 एप्रिल

बेळगावमध्ये महापौर पद निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटक सरकारने केलेल्या दंडेलीचा निषेध आज मुंबईत शिवसैनिकांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासमोर केला.

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येडियुरप्प हॉटेल ताजमध्ये आले होते. त्यावेळी जवळपास 100 शिवसैनिकांनी ताजसमोर निदर्शने केली. शिवसैनिकांनी ताजमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निदर्शकांना रोखले.

यात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, बाळा सावंत, दिवाकर रावते, नीलम गोर्‍हे , किरण पावसकर, दीपक सावंत, जी. जी. उपरकर सहभागी झाले.

निदर्शकांना रोखण्यासाठी एसआरपीच्या 10 गाड्या रवाना झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close