S M L

'भायुमो'च्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे ?

30 एप्रिलमुंबई :भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या नव्या कार्यकारिणीचा चेहरा हा अधिक तरूण ठेवण्याच्या दृष्टीने नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे- पालवे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा यांना पक्षात अधिक मोठी जबाबदारी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गोटात चर्चा सुरू आहे. त्यांची महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्षपदावरही बदल अपेक्षित असून तिथे एखादा तरूण मराठी चेहरा आणण्याचा विचार सुरू आहे. आमदार आशिष शेलार यांचं नाव या स्पर्धेत सर्वात पुढे असलं तरी या पदाबाबतचा निर्णय मुंडे आणि गडकरी यांच्या मताशिवाय होणार नाही. भाजपच्या राज्य परिषदेची बैठक येत्या 7 मे ला मुंबईत होतेय. त्यानंतर येत्या काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेता नेमणुकांवरून कोणताही वाद न होण्याची खबरदारी घेण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:00 PM IST

'भायुमो'च्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे ?

30 एप्रिल

मुंबई :भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या नव्या कार्यकारिणीचा चेहरा हा अधिक तरूण ठेवण्याच्या दृष्टीने नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे- पालवे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा यांना पक्षात अधिक मोठी जबाबदारी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गोटात चर्चा सुरू आहे. त्यांची महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्षपदावरही बदल अपेक्षित असून तिथे एखादा तरूण मराठी चेहरा आणण्याचा विचार सुरू आहे.

आमदार आशिष शेलार यांचं नाव या स्पर्धेत सर्वात पुढे असलं तरी या पदाबाबतचा निर्णय मुंडे आणि गडकरी यांच्या मताशिवाय होणार नाही. भाजपच्या राज्य परिषदेची बैठक येत्या 7 मे ला मुंबईत होतेय. त्यानंतर येत्या काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेता नेमणुकांवरून कोणताही वाद न होण्याची खबरदारी घेण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close