S M L

महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीयांची कोल्हापूर बंदची हाक

30 एप्रिलकोल्हापूर : इथं टोलनाक्यांच्या तोडफोडीविरोधात उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. तसंच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांना घेराव घालण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला शहरातले 2 टोल नाके फोडण्यात आले. फुलेवाडीचा टोलनाका जाळण्यात आला तर उचगावच्या टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी काही ठिकाणी मनसेचे झेंडे आढळल्यानं यामागे मनसे असल्याचा संशय व्यक्त होतोय. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. पण, निकृष्ट कामामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय. रस्त्यांच्या मोबदल्यात 30 वर्ष टोल द्यावा लागणार आहे. वाढता विरोध लक्षात घेऊन नगरविकास खात्याने टोलला स्थगिती दिली होती. पण, सरकारनं ही स्थगिती उठवल्याने पुन्हा एकदा शहरात टोलविरोधी आंदोलनानं जोर धरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:00 PM IST

महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीयांची कोल्हापूर बंदची हाक

30 एप्रिल

कोल्हापूर : इथं टोलनाक्यांच्या तोडफोडीविरोधात उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. तसंच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांना घेराव घालण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला शहरातले 2 टोल नाके फोडण्यात आले.

फुलेवाडीचा टोलनाका जाळण्यात आला तर उचगावच्या टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी काही ठिकाणी मनसेचे झेंडे आढळल्यानं यामागे मनसे असल्याचा संशय व्यक्त होतोय. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. पण, निकृष्ट कामामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय.

रस्त्यांच्या मोबदल्यात 30 वर्ष टोल द्यावा लागणार आहे. वाढता विरोध लक्षात घेऊन नगरविकास खात्याने टोलला स्थगिती दिली होती. पण, सरकारनं ही स्थगिती उठवल्याने पुन्हा एकदा शहरात टोलविरोधी आंदोलनानं जोर धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close