S M L

जायकवाडीच्या पाण्यासाठी पोलिसांचा पहारा

30 एप्रिलसंगमनेर : मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलेल्या पाण्यानं निम्मा टप्पा पार केला आहे. मात्र, कोरडं नदीपात्र, बाष्पीभवनाचा वाढतं प्रमाण वाळू उपशामुळे पडलेले खड्डे यामुळे पाण्याचा वेग कमालीचा मंद आहे. या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. आज संगमनेर तालुक्यातल्या ओझर बंधार्‍यापर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. पाणी चोरी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावांची वीजही बंद करण्यात आली. पण हे पाणी जायकवाडीला सोडल्यानं नगरमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा तक्रारी शेतकरी व्यक्त करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 01:59 PM IST

30 एप्रिल

संगमनेर : मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलेल्या पाण्यानं निम्मा टप्पा पार केला आहे. मात्र, कोरडं नदीपात्र, बाष्पीभवनाचा वाढतं प्रमाण वाळू उपशामुळे पडलेले खड्डे यामुळे पाण्याचा वेग कमालीचा मंद आहे.

या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. आज संगमनेर तालुक्यातल्या ओझर बंधार्‍यापर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. पाणी चोरी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावांची वीजही बंद करण्यात आली. पण हे पाणी जायकवाडीला सोडल्यानं नगरमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा तक्रारी शेतकरी व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close